कवितेचे शीर्षक *कळप*
शिखरावर बसलेले सर्रास खोट बोलतात
हसतात त्यांच्या वर जे खर बोलतात
खोट बोलनार्यान्चा एक कळप असतो
जो सेवेच्या नावाखाली समाजाला छळत असतो
काही केल्या उतरत नाहि त्यांच्या पदाची धुन्दी
चाटूगिरी करायला ठेवतात आपले भक्त अंधी
आम्ही समाज उद्धारक असे त्यांना वाटते.
खरे लोक येवू नये म्हणून त्यांचे पत्ते कापते
वचनावर त्यांच्या समाज फिदा असतो
परंतु दिलेले वचन कधीच पाळत नसतो
मंच माला माइक हाच त्यांच्या ध्यास
करतात त्या साठी जमेल तसा प्रयास
समाजातील राजकरण खूप वाईट असते
म्हणून नवीन लोक समाजाला जुळत नसते
दानाची बोली लावून जे देत नाही पैसे
समाजात मिरावतात बड़े नेता जैसे
छोट्या कार्यकर्त्यांना खिशात भरून ठेवतात
वेळ जशी येईल तसा वापर करतात
भासवतात असे की समाज एकत्रित आहे
पण तसे नसून फक्त त्यांच्या कळप मजबूत राहे